जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२३ । पाचोरा शहरातून एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. नऊ वर्षीय बालिकेवर नात्यातीलच 18 वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयित नराधम तरुणाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नऊ वर्षीय बालिकेचे आई-वडील बाहेरगावी गेल्याने बालिकेस याच परीसरात राहणार्या आपल्या नातलगांकडे ठेवण्यात आले होते. रविवारी दुपारी बालिका व तिचा नातलग असलेला युवक घरात एकटे असल्याने त्याचा फायदा घेऊन बालिकेवर अतिप्रसंग करण्यात आला.
भयभीत झालेल्या बालिकेने आपबिती सांगितल्यानंतर सायंकाळी पोलिसात पीडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व त्यास अटक रकण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहेत.