जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण वाढताना दिसत असून आठवड्यातून एक तरी कारवाई होतच आहे. अशातच आता चाळीसगावातील रहिवासी व तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला 50 हजारांची लाच स्वीकारताना आज सोमवारी दुपारी रंगेहात अटक करण्यात आलीय. देवराम किसन लांडे (शशिकला नगर, चाळीसगाव) असं लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून या कारवाईने आरोग्य यंत्रणेतील लाचखोर हादरले आहेत.
केंद्र सरकारच्या आरोग्य वर्धिनी योजनेंतर्गत तक्रारदाराची जमीन भाड्याने घेऊन त्यावर नियमित भाडे सुरू करण्यासाठी ही लाच स्वीकारण्यात आली.
देवराम किसन लांडे लाचेची मागणी केल्याने जळगाव जिल्ह्यातील तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार केली होती. त्यांनुसार धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात सहकार्यांनी देवराम लांडे याला लाच घेताना रंगेहात ताब्यात घेतलं.