⁠ 
शनिवार, डिसेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | अखेर मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांचा पाचोरा दौरा ठरला ; आ. किशोर पाटलांनी जाहीर केली तारीख

अखेर मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांचा पाचोरा दौरा ठरला ; आ. किशोर पाटलांनी जाहीर केली तारीख

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२३ । एक वेळा मुहूर्त हुकल्यावर अखेर शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार पाचोरा दौरा ठरला आहे. आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत तारीख सांगितली आहे.

त्यानुसार ९ सप्टेंबर रोजी हे तिघेही मान्यवर “शासन आपल्या दारी” या अभियानासाठी पाचोरा दौऱ्यावर येत असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली.९ रोजी शहरातील भडगाव रोडवरील शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयाच्या प्रांगणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्याचे अन्य मंत्री जिल्ह्यातील आमदार, खासदार यावेळी उपस्थित राहणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.

या “शासन आपल्या दारी” योजनेचा लाभ घेण्यासाठी सुमारे २५ हजार लाभार्थी उपस्थित राहणार असुन औद्योगिक वसाहत, ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, ५ कोटी रुपयांचे ऑक्सिजन पार्क (जॉगिंग ट्रॅक) भुमिपुजन, गिरड रोडवरील काकनबर्डी येथील परिसर सुशोभीकरणाचे भुमिपुजन, क्रिडा संकुलाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.