कापसावर रोटोव्हेटर चालवून क्षणार्धात उभे पीक केले आडवे, शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू तरळले‎

ऑगस्ट 30, 2023 9:45 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२३। गेल्या काही दिवसापासून पावसाने पावसाने दडी मारली असून यामुळे खरिपाचा हंगाम वाया जाण्याची शक्यता असून शेतकऱ्यांचा धीर देखील सुटू लागला आहे. अशातच पाण्या अभावे पिकांची वाढ खुंटल्याने शेतकऱ्याने भावनिक होत कापसावर रोटोव्हेटर चालवून क्षणार्धात उभे असलेले पीक आडवे केले आहे. ही घटना मांडळ येथे घडली.

mandava jpg webp

राज्यासह जळगाव जिल्ह्यात ऑगस्ट सुरुवातीपासून पावसाने पाठ फिरवली आहे. मांडळसह आजूबाजूच्या परिसरात हंगामाच्या सुरुवातीपासूनच पाहिजे तसा पाऊस परिसरात झालेला नाही. तरी शेतकऱ्यांनी थोड्याफार पाण्यावर पेरणी करून घेतली. जुलै महिन्यात थोडाफार हलका पाऊस झाला त्यावर पिकांची थोडेफार वाढ झाली. परंतु गेल्या महिन्यापासून परिसर पार कोरडा झालेला आहे. विहिरींनी सुद्धा तळ गाठलेला आहे. शेतातील पिके सुकू लागले आहेत.

स्वप्नावर फिरवला रोटाव्हेटर
मांडळ येथील शेतकरी महेश धनराज पवार यांनी आपल्या चार एकर क्षेत्रावर कापूस पेरला. यंदा तरी चांगले उत्पादन िनघेल अशी आशा त्यांना होती. मात्र पेरणीनंतर पावसाने वेळोवेळी खंड दिल्याने िपकांची वाढ खुंटली व होत्याचे नव्हते झाले. केलेला खर्चही न निघण्याची आशा धुसर झाल्याने निराश होऊन महेश पवार यांनी आपल्या चार एकर कापूस शेतीवर रोटाव्हेटर फिरवला.रोटाव्हेटर चालवताना महेश पवार‎यांच्या डोळ्यात अश्रू तरळले‎होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now