⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | भरारी फाऊंडेशन व के.के.कँन्सतर्फे सीव्हील हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना पीपीई कीटचे वाटप

भरारी फाऊंडेशन व के.के.कँन्सतर्फे सीव्हील हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना पीपीई कीटचे वाटप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२१ । पद्मावती मंगल कार्यालयात रुग्णांच्या 60 नातेवाईकांना जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे, उद्योजक रजनीकांत कोठारी,उद्योजक अमित भाटीया यांच्या हातून देण्यात आले. या प्रसंगी भरारी फाऊंडेशनचे दिपक परदेशी, रितेश लिमडा, दिपक विधाते, सचिन महाजन उपस्थित होते.

सीव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना पिपिई कीट घातल्याशिवाय हॉस्पिटलच्या आवारात यायला परवानगी नाकारण्यात आली आहे. यामुळे रुग्ण नातेवाईकांच्या इमर्जन्सी कामासाठी जाणे शक्य नव्हते. ही गैरसोय दूर करत ज्या रुग्णांच्या नातेवाईकांची हलाकिची परिस्थिती आहे किवा ते पिपिई कीट विकत घेऊ शकत नाही अशा रुग्नाच्या 60 नातेवाईकांनाभरारी फाऊंडेशन व के के कॅन्स मार्फत  पिपिई कीट वितरित करण्यात  आले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.