जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२३ । गेल्या काही महिण्यापुर्वी झालेल्या रेल्वे अपघातात शेकडो प्रवाशांना जीव गमवावा लागला होता. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र अशातच तामीळनाडूमध्ये (Tamilnadu) मदुराई (Madurai) स्टेशनवर यार्डमध्ये उभ्या असलेल्या ट्रेनला भीषण आग लागल्याची घटना समोर आली असून यात 10 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर 20 हुन अधिक प्रवाशी जखमी झाले आहे. रेल्वेने प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
ही ट्रेन लखनऊहून रामेश्वरमला (Rameshwaram) निघाली होती. आग इतकी भयानक होती की, संपूर्ण डब्ब्याला आगीने काहीवेळात वेढा घातला होता. अग्निशमन दलाचे जवान विझवण्याचं काम युद्ध पातळीवर करीत आहेत. आगीची घटना पाहून इतर प्रवासी प्रचंड घाबरले आहेत. नेमकी आग कशामुळे लागली याची माहिती मिळालेली नाही. रेल्वे पोलिस आणि इतर पथकं घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.
लखनऊहून रामेश्वरमला निघालेली ही ट्रेन सकाळी साडेपाच वाजता मदुराई स्टेशनवर थांबली होती. त्यावेळी गाडीला आग लागली आहे. आग लागल्याची माहिती सगळीकडं व्हायरल झाल्यानंतर तिथं अग्नीशमक दल आणि पोलिसांना पाचारण करण्यात आलं होतं. तोपर्यंत १० प्रवाशांचा आगीने मृत्यू झाला, तर २० जण जखमी झाल्याची माहिती मिळाळी आहे.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या डब्ब्याला आग लागली तो एक खासगी डब्बा होता. नागरकोइल जंक्शन येथे शुक्रवारी हा डब्बा जोडण्यात आला होता. त्या काही प्रवासी अवैद्यरित्या सिलेंडर घेऊन निघाले होते. त्यांच्याकडे असलेल्या गॅस सिलेंडरमुळं डब्ब्याला आग लागली असल्याचं अधिकाऱ्यांनी जाहीर केलं आहे. एकचं डब्बा पूर्णपणे जळाला असून इतर डब्बे पुर्णपणे सुरक्षित आहेत असंही अधिकाऱ्यांनी जाहीर केलं आहे. . रेल्वेने प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.