⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | आयुष्यातील महत्वाचे क्षण कॅमेरात टिपले जातात – डॉ.केतकी पाटील

आयुष्यातील महत्वाचे क्षण कॅमेरात टिपले जातात – डॉ.केतकी पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२३ । आयुष्यातील अत्यंत महत्वाचे क्षण कॅमेऱ्यात टिपून कायमस्वरूपी स्मरणात ठेवले जातात. 18 व्या शतकापासून जागतिक फोटो ग्राफर डे साजराहोतो. कालानुरूप कॅमेरा बदलत गेले, आज मोबाईल मध्ये कॅमेरे पोहचले त्यामुळे सेल्फी ट्रेंड आला. पण प्रोफेशनल फोटोग्राफी आजही टिकून आहे असे प्रतिपादन गोदावरी फाउंडेशन च्या संचालिका डॉ. केटकीताई पाटील (Dr. Ketkitai Patil) यांनी केले.

गोदावरी फाऊंडेशन, भवरलाल अँड कांताबाई जैन चॅरिटेबल ट्रस्ट व फोटोग्राफर असोसिएशन आयोजित जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यांची होती उपस्थिती:
यावेळी मंचावर डॉ. विद्या गायकवाड, आयुक्त मनपा जळगाव ,माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, शिवसेना शिंदे गटाच्या सरिता माळी ,माजी नगरसेवक कांतीलाल चौधरी, वाल्मिक पाटील, अशोक लाडवंजारी, माजी महापौर विष्णू भंगाळे, जेडीसीसी बँक चेअरमन संजय पवार, जमील देशपांडे, माजी नगरसेवक सुनील माळी, शरद तायडे, डॉ.रिजवान, राजू मोरे उपस्थित होते.

दीप पूजन व कॅमेरा पूजन याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शब्बीर सैय्यद ,अध्यक्ष फोटो ग्राफर असोसिएशन, उपाध्यक्ष सतीश जगताप (मार्तंड फोटो स्टुडिओ), वैभव धर्माधिकारी, सचिव अतुल वडणेरे व सदस्य उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.