जळगाव लाईव्ह न्यूज। १८ ऑगस्ट २०२३। पोटदुखी ही विविध कारणांमुळे होत असते पण अनेकदा एक्स रे, सोनोग्राफी द्वारे तपासणीतूनही पोटदुखीचे कारण समजून येत नाहीत. मात्र आता पोटाच्या कोणत्याही प्रकारच्या विकारांसाठी तुम्हाला भीती बाळगण्याचं काम नाही. गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, इआरसीपी, पॉलीपेक्टॉमी यासारख्या सर्व उपचार पध्दतींव्दारे अचूक उपचार आता जळगाव जिल्ह्यातही उपलब्ध झाले आहेत.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालय हे अत्याधुनिक सेवा-सुविधांचा लाभ रुग्णांना उपलब्ध करुन देत आहे. त्यात पोटविकारासाठी आवश्यक तपासण्या जसे की, गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, इआरसीपी, पॉलीपेक्टॉमी याद्वारे रुग्णाच्या आजाराचे निदान व काही आजारांवर उपचार देखील करणे शक्य आहे. याकरीता दर गुरुवारी एन्डोस्कोपी तज्ञ डॉ.भुषण चोपडे हे येथे सेवा देतात. मागील दिड वर्षांपासून येथे हजारो रुग्णांच्या आजाराचे निदान तसेच उपचारही येथे करण्यात आले. त्याकरीता एक दिवस आधी नावनोंदणी करणे आवश्यक असून अधिक माहितीसाठी निवासी डॉ.हेत्वी ७०८३९६६१२६, डॉ.हर्ष ८८८८५९३०४९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
–अशी लक्षणे जाणवल्यास संपर्क साधा–
पोटात जळजळ, जुलाब, बद्धकोष्टता, कावीळ, रक्ताच्या उलट्या, शौचात रक्त पडणे, पोटात पाणी जमा होणे, सतत उलटी होणे, पोटात गाठ, हिपॅटायटिस, ए/बी/सी/ई, स्वादुपिंडावर सूज, पित्तनलिकेत गाठ, अल्सरेटिव कोलाइटिस, क्रॉन्स डिसीजची लक्षणे जाणवल्यास लगेचच संपर्क साधावा. या निदान व उपचार पद्धतीद्वारे अन्ननलिका व पोटातील गिळलेले नाणे, पिन, बॅटरी, सेल काढणे शक्य होते तसेच आतड्याच्या व अन्ननलिकेच्या कॅन्सरचे निदान करणेही याद्वारे सोपे झाले आहे.
–या उपचार पद्धती उपलब्ध–
ऑलिंपस सीव्ही १९० एंडोस्कोपी मशिनद्वारे डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयात उपचार केले जातात. त्यात गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, इआरसीपी, पॉलीपेक्टॉमी यांचा समावेश आहे. या उपचार पद्धतींची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे –
गॅस्ट्रोस्कोपी – या उपचार पद्धतीत दुर्बिणीद्वारे अन्ननलिका, जठर व छोट्या आतड्यांची तपासणी केली जाते.
कोलोनोस्कोपी – यात दुर्बिणीद्वारे मोठ्या आतड्यांची तपासणी केली जाते.
इआरसीपी – यात दुर्बिणीद्वारे पित्तनलिकेतील खडाही काढला जातो.
पॉलीपेक्टॉमी – या उपचार पद्धतीत अन्ननलिकेतील गाठ विना शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे काढणे शक्य आहे.