⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

राज्य सरकारचा मोठा निर्णय ; रेशनकार्डधारकांना देणार 100 रुपयात ‘या’ वस्तू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२३ । आज शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून यावेळी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. यात गौरी गणपती, दिवाळीसाठी राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय झाला. शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल देण्यात येणार आहे. चला जाणून घेऊया बैठकीतील निर्णय

आजचे मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
राज्यातील 17 जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार. भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबवणार आहे. पाच हजार कोटीचा प्रस्ताव (आदिवासी विकास विभाग)
गौरी गणपती, दिवाळीसाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा शिधा (अन्न व नागरी पुरवठा)
आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात भरीव वाढ. आता दरमहा 500 रुपये मिळणार (कौशल्य विकास )
मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी (महसूल विभाग)
महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द (गृह विभाग )
केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम, राज्याचा हिस्सा वाढला (महिला व बाल विकास)
सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा 2023 चा अध्यादेश मागे (सहकार विभाग )
दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन
(विधी व न्याय विभाग )
मंडणगड येथे दिवाणी न्यायालय (विधी व न्याय विभाग)