⁠ 
बुधवार, मे 22, 2024

ब्रेकींग : जळगावातील मोठ्या फर्मची ED आणि IT विभागाकडून चौकशी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १७ ऑगस्ट २०२३ | जळगाव शहरातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक राजमल लखीचंद ज्वेलर्समध्ये (Rajmal Lakhichand Jewellers) सक्त वसुली संचालनालय आणि आयकर विभागाकडून चौकशी केली जात आहे. चौकशी कोणत्या कारणाने सुरू आहे हे मात्र अद्याप सांगण्यात आलेले नाही.

जळगाव शहरातील प्रसिद्ध सराफ पेढी राजमल लखीचंद ज्वेलर्समध्ये गुरुवारी पहाटे गाड्यांचा ताफा पोहचला. फर्ममध्ये सक्तवसुली संचालनालय आणि आयकर विभागाची धाड पडल्याचे सुरुवातीला सांगण्यात येत होते. मात्र फर्म संबंधित एका व्यक्तीशी चर्चा केली असता सक्तवसुली संचालनालय आणि आयकर विभागाकडून चौकशी सुरु असून माजी आ.मनीष जैन हे मध्ये अधिकाऱ्यांशी बोलत असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या फर्ममध्ये सक्तवसुली संचालनालय आणि आयकर विभागाचे अधिकारी चौकशी करीत आहे. फर्ममध्ये ग्राहकांना जाऊ दिले जात नसून इतर कर्मचारी देखील बाहेर उभे आहेत. दोन्ही पथक कोणत्या कारणासाठी चौकशी करीत आहेत हे अद्याप समोर आलेले नसून काही वेळाने माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे