⁠ 
मंगळवार, मे 21, 2024

Yawal : ग्रामपंचायतीमधील गैरव्यवहाराची चौकशी होईना, अखेर पं.स.चे माजी गटनेते शेखर पाटलांचे उपोषण सुरु

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२३ । यावल तालुक्यातील सावखेडासिम येथील ग्रामपंचायतीमधील गैरव्यवहार प्रकाराची कुठलीही चौकशी होत नसल्याने अखेर आज १४ ऑगस्ट रोजी येथील पंचायत समितीचे माजी गटनेते (काँग्रेस) शेखर सोपान पाटील यांनी त्यांच्या सोबत सावखेडा सिम गावाचे ग्रामस्थ यांनी ग्रामस्थांसोबत यावल पंचायत समिती समोर आपले आमरण उपोषणास सुरू केले आहे.

या आहेत मागण्या
उपोषणास बसलेल्या शेखर पाटील यांनी या प्रमुख मागण्यांकडे पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधले असुन, यात ग्रामपंचायत सावखेडा येथील सन २०२० पासून तर आज पर्यंत आलेल्या पंधराव्या वित्त आयोगातील कामाचे अनियमित टेंडर व अनियमित कामांची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करणे , तसेच ग्रामनिधी पाणीपुरवठा निधीमध्ये झालेल्या अपहारास कारणीभूत असलेल्यां वर तात्काळ कार्यवाही करणे, त्याचप्रमाणे एकाच ठेकेदारास बेकायदेशीर कामे दिल्याने दोषी असलेल्या ग्रामसेवकास निलंबित करण्यात यावे अशा मागण्यांचा समावेश आहे.

आज १४ ऑगस्ट पासुन शेखर पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास सावखेडा सिम ग्रामपंचायतच्या सदस्य सौ वर्षा अजय पाटील , नसीमा फारूक तडवी, रहीमान रमजान तडवी , सलीम मुसा तडवी , विनायक धना पाटील, शाहरूख राजु तडवी , निखिल खुशाल पाटील , समीर जुम्मा तडवी , दगेखा सिकंदर तडवी, भिकारी कालु तडवी यांनी ही उपोषणात सहभाग घेतला असुन , यावलचे प्रभारी माजी नगराध्यक्ष राकेश कोलते, काँग्रेस कमेटीच्या अनुसुचित जाती विभागाचे तालुका अध्यक्ष अनिल जंजाळे ,काँग्रेसचे यावल शहराध्यक्ष कदीर खान , राष्ट्रवादीचे अॅड देवकांत पाटील आदीनी आपला पाठींबा दर्शविला आहे .