⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगाव मनपाचा गलथान कारभार ; अंध वृद्ध महिला गटारीच्या चेंबरमध्ये पडली अन्…

जळगाव मनपाचा गलथान कारभार ; अंध वृद्ध महिला गटारीच्या चेंबरमध्ये पडली अन्…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२३ । आधीच जळगाव शहरातील रस्त्यांसह विविध समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून यातच महापालिकेच्या गलथान कारभारामुळे भिक्षा मागणारी एक अंध वृद्ध महिला गटारीच्या चेंबरमध्ये पडल्याची घटना घडली. प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी दोरीच्या सहाय्याने या महिलेला सुखरूप बाहेर काढलं.

मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या बाजूलाच असलेल्या गोलांनी मार्केट परिसरात झाकण नसल्याने ते उघड्या अवस्थेत आहे. यातच भिक्षा मागणारी एक अंध वृद्ध महिला काल गटारीच्या चेंबरमध्ये पडली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी दोरीच्या सहाय्याने या महिलेला सुखरूप बाहेर काढलं. महिलेला बाहेर काढण्यास वेळ झाला असता तर कदाचित या ठिकाणच्या घाणेरड्या पाण्यामध्ये तसेच अस्वच्छतेमध्ये गुदमरून या महिलेचा मृत्यू झाला असता.

महापालिकेच्या अगदी जवळ असलेल्या उघड्या चेंबरकडे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनासह कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले असून महापालिकेच्या गलथान आणि भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.