जळगाव लाईव्ह न्यूज : ११ ऑगस्ट २०२३ : आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या अभियान अंतर्गत सावदा शहरातील विविध ८ भागांमध्ये सावदा नगरपरिषद व गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकी पाटील यांच्या सहकार्याने ११ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण करण्यात आले. दिवसभरातील या उपक्रमात ७५ झाडांची लागवड करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच ‘मन की बात’ कार्यक्रमात या मोहिमेची घोषणा केली होती. या अभियानांर्तगत आपले गाव, पंचायत, आपला परिसर आणि पृथ्वी वाचवण्यासाठी 75 देशी रोपे लावण्यात येत आहेत.
जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये प्रथमच आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या अभियाना अंतर्गत गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकी पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण हा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली. ९ ऑगस्टपासून सुरु झालेल्या ह्या अभियानात पहिल्याच दिवशी डॉ.केतकी पाटील यांच्याहस्ते नेरी दिगर, जामनेर, मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, यावल, रावेर, चोपडा, विटाळी ता नांदुरा, मलकापूर आदि ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
११ ऑगस्ट रोजी सावदा शहरात ख्वाजा मशिद कॉलनी येथून वृक्षारोपणास सुरुवात झाली. याप्रसंगी डॉ.केतकी पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, नगरसेविका सुभद्राबाई सिद्धार्थ बडगे, डॉ.उल्हास पाटील सीबीएससी इंग्लिश स्कूलच्या प्रिन्सिपल भारती महाजन, नगरसेवक गुड्डू शेठ, शब्बीर इब्राहिम, शेख अंनिस शेख इब्राहिम, अॅड.जावेद शेख, इंडिया न्यूजचे पत्रकार शेख मुख्तार, फरीद शेख, नवराष्ट्र न्यूज पेपरचे वार्ताहर युसुफ शहा, माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक रवी बेंडाळे, डॉ.संकेत भंगाळे, हबीब तडवी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.