⁠ 
रविवार, मे 19, 2024

कन्नड घाटात आजपासून ‘या’ वाहनावर बंदी ; आता असा असणार पर्यायी मार्ग

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२३ । कन्नड-चाळीसगाव दरम्यानचा औट्रमघाट (कन्नड घाट) मधून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे आज म्हणजेच 11 ऑगस्टपासून कन्नड घाटात जड वाहतुकीला बंदी असणार आहे.

विशेष म्हणजे यासाठी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी बंदी असलेल्या वाहनांसाठी तीन पर्याय सुचवले आहेत. तर या काळात उपयोजना म्हणून ठिकठिकाणी पोलीस पॉईंट आणि पेट्रोलिंग वाहन तैनात करण्यात आले आहेत.

औरंगाबाद ते चाळीसगाव दरम्यानचा औट्रम (कन्नड) घाटातील सततच्या वाहतूक कोंडीवर औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने महत्वाचा आदेश दिला आहे. न्यायालयाने औरंगाबाद ते चाळीसगाव दरम्यानचा औट्रम घाटातील वन्यजिव प्राणी रक्षण व सतत होणारी वाहतुक कोंडीमुळे सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास होत असल्यामुळे औम घाटातील जड वाहतुक आजपासून बंद केली आहे. दरम्यान, तीन पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. तसेच बंद केलेल्या व पर्यायी दिलेल्या रोडवरील पोलीस ठाणे खुलताबाद, देवगाव रंगारी, शिल्लेगाव, शिऊर, कन्नड ग्रामीण या पोलीस ठाणेच्या 5 पेट्रोलींग वाहने सतत पेट्रोलींग करणार आहे

असा असणार पर्यायी मार्ग?
पूर्वीचा मार्ग: औरंगाबाद ते कन्नड मार्गे चाळीसगाव-धुळे जाणारी जड वाहतुक
पर्यायी मार्ग: औरंगाबाद ते दौलताबाद टि पॉईट – कसाबखेडा – शिऊर बंगला- तलवाड़ा- नांदगाव मार्गे चाळीसगाव

पूर्वीचा मार्ग: चाळीसगाव – कन्नड औरंगाबाद कडे – येणारी जड वाहतुक
पर्यायी मार्ग: चाळीसगाव – नांदगाव तलवाड़ा- शिऊर बंगला – कसावखेडा – दौलताबाद टि पॉईट औरंगाबाद

पूर्वीचा मार्ग: जळगाव सिल्लोड फुलंबी- खुलताबाद मार्गे कन्नड कडे जाणारी वाहतुक
पर्यायी मार्ग: जळगाव-सिल्लोड फुलंब्री औरंगाबाद मार्गे दौलताबाद टि पॉईट- कसावखेडा-शिऊर बंगला-नांदगाव मार्गे चाळीसगाव जातील.