जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२३ । मागील काही दिवसापासून सोने (Gold Rate) आणि चांदीच्या (Silver Rate) किमतीत सतत चढउतार सुरूच आहे. जुलै महिन्यात सोने-चांदीने दरवाढीची मोहिम हाती घेतली होती. पण दोन्ही धातूंना नवीन विक्रम करता आलेला नाही. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच सोने चांदीत घसरण दिसून आली. यादरम्यान, गेल्या २४ तासात चांदीच्या किमतीत तब्बल २ हजार रुपयाहुन अधिकची घसरण झालेली दिसून आहे. तर दुसरीकडे सोन्याचा दर किंचित वाढलेला आहे. येत्या पंधरवड्यात सोन्याचा दर पुन्हा उच्चांकी गाठण्याची शक्यता आहे. Gold Silver Rate Today
काय आहे जळगाव सुवर्णनगरीतील दर?
जळगाव सुवर्ण नगरीत सध्या २२ कॅरेट सोने विनाजीएसटी ५४,६०० रुपये प्रति १० ग्रॅम इतके आहे. तर सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ५९,८०० रुपयावर आहे. यापूर्वी काल (४ ऑगस्ट) सकाळच्या सत्रात सोने ५९७०० रुपयांवर होते. त्यात शंभर रुपयाची वाढ झालेली दिसतेय.
मात्र दुसरीकडे चांदीच्या किमतीत मोठी घसरण झालेली आहे. काल (४ ऑगस्ट) सकाळच्या चांदीचा दर विनाजीएसटी ७५००० रुपयावर होता. तो सध्या ७२८०० रुपयावर आला आहे. गेल्या २४ तासात चांदीच्या किमतीत २००० ते २३०० रुपयाची घसरण झालेली आहे.
सोने पुन्हा उच्चांक गाठणार
दरम्यान, सध्या सोन्याचा दर ६० हजाराखाली असला तरी येत्या पंधरवड्यात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ६२ हजारांवर जाणार असल्याचा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे. गेल्या तीन महिन्यापूर्वी सोन्याच्या किमतीने विनाजीएसटी ६२ हजाराचा टप्पा ओलांडला होता. मात्र ते आता ६० हजाराखाली आले आहे. परंतु आता या दरात पुन्हा तेजीची स्थिती निर्माण झाली आहे.