⁠ 
मंगळवार, ऑक्टोबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | कोरोना नियमांचे उल्लंघन ; जळगावात आमदार,माजी खासदारासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

कोरोना नियमांचे उल्लंघन ; जळगावात आमदार,माजी खासदारासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२१ । काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत जळगावात येथील अजिंठा विश्रामगृहात पक्षाची बैठक पार पडली. पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्थानकात २० ते २५ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे १५ मे रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर होत्या. त्यांच्या उपस्थितीत अजिंठा शासकीय विश्रामगृहावर दुपारी एक ते सायंकाळी पाच या कालावधीत पक्षाचे पदाधिकारी व महत्वाच्या  कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीचे आयोजन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड संदीप पाटील व इतर पदाधिकाऱ्यांनी केले होते. बैठक घेण्यापूर्वी पक्षाने पोलीस व जिल्हा प्रशासनाची कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचा अभाव होता, तर काही जण विना मास्क होते. कोरोनाचा संसर्ग पसरविण्यास ही कृती कारणीभूत ठरली. जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या सर्वच नियमांचे उल्लंघन या बैठकीत करण्यात आले होते.

याची दखल घेत आज नियमांचे उल्लंघन करून बैठक घेतल्या प्रकरणी आज मंगळवारी रामानंदनगर पोलीस स्थानकात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांविरूध्द कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात रावेरचे काँग्रेस आमदार शिरीष चौधरी, पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, युवक जिल्हाध्यक्ष हितेश पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, माजी अध्यक्ष उदय पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, श्याम तायडे यांच्यासह इतर २० ते २५ पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा त्यात समावेश आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.