⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | गुन्हे | फेक कॉलपासून सावधान! विमा परताव्याचे आमिष देऊन साडे पाच लाखाची फसवणूक

फेक कॉलपासून सावधान! विमा परताव्याचे आमिष देऊन साडे पाच लाखाची फसवणूक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज। २१ जुलै २०२३ । भडगाव तालुक्यातील गुढे येथील तरुणाची विमा पॉलिसीचा परतावा वाढवून येणार, असे सांगून तब्बल साडे पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. सध्या सायबर गुन्ह्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सायबर गुन्हेगार व्यक्तींना सराईतपणे फसवून पैसे उकळण्याचे काम करत आहे. अशातच दीपक पितांबर चौधरी (वय ३८, रा. गुढे, ता. भडगाव) यांची विमा परताव्याच्या नावाखाली तब्बल साडे पाच लाख रुपयांची फणसणूक करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे.

दीपक चौधरी याना विमापॉलिसीचा परतावा वाढवून देणार, असे आमिष दाखविले. सायबर गुन्हेगारांनी स्वतःची ओळख लपवून ८११६७९९३१८ व ९५४०३८३४६१ या भ्रमणध्वनी क्रमांकावरून यांच्या मोबाईलवर वेळोवेळी संपर्क साधून साधला. अविवा लाईफ इन्शुरन्स पॉलिसी कंपनीमधून बोलत असल्याचे सांगून विमा पॉलिसीचा परतावा वाढवून देण्याचे आमिष दाखविले. तब्बल पाच लाख २९ हजार ५०८ रुपयांत फसवणूक करण्यात आली.

प्रत्यक्षात कोणताही परतावा न देता दीपक चौधरी यांना वेगवेगळे कारणे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाईन पाच लाख २९ हजार ५०८ रक्कम उकळून फसवणूक केली. या प्रकरणी दीपक चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलिसांत दीपककुमार तिवारी व हेमंत सरकार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक बबन जगताप तपास करीत आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह