जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२१ । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाकडून लॉकडाऊन 1 जून पर्यंत वाढवण्यात आले आहे. त्याअनुषंगाने एरंडोल शहरात नियम बाह्य दुकानें सुरु ठेवणाऱ्या दुकानदारांनावर व सकाळी 11 वाजेनंतर बाहेर फिरणाऱ्यावर आज दि.१७ मे रोजी दंडात्मक कार्यवाही करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आले.
याप्रसंगी एरंडोलचे प्रांताधिकारी श्री विनय गोसावी हे स्वतः रस्त्यावर उतरुन कारवाई करीत होते.त्यांच्या सोबत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, एरंडोल न.पा. चे मुख्याधिकारी जनार्दन पवार,कार्यालयीन अधिक्षक हितेश जोगी,पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे,तुषार देवरे,पोलीस कर्मचारी संदिप सातपुते,संतोष चौधरी,विकास खैरनार,रवी सफकाळे, बांधकाम अभियंता देवेंद्र शिंदे, विनोदकुमार पाटील, अजित भट,अशोक मोरे, आर.टी.महाजन,प्रकाश सूर्यवंशी, सर्व वसुली कर्मचारी व गृहरक्षक दलाचे महिला व जवान उपस्थित होते.