⁠ 
शनिवार, मे 18, 2024

रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी ; पारोळा तालुक्यातील घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२३ । पारोळा तालुक्यातील पळासखेडे येथील शेतकऱ्यावर रानडुकरांने हल्‍ला केला. यात शेतकरी जखमी झाला असून रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

पळासखेडे येथे गेल्या अनेक दिवसांपासून रानडुकरांचा धुमाकूळ सुरू आहे. दरम्यान, येथील शेतकरी दिनकर शिवाजी पाटील व त्यांची पत्नी दिनकर पाटील हे दोघेजण त्यांच्या शेतामध्ये कपाशी निंदनीचे काम करत होते. या दरम्‍यान त्यांच्या मागून रानडुक्कर येऊन त्याने शेतकरी दिनकर पाटील यांना जबर धडक दिली. यात सदर शेतकरी हे दगडावरती पडल्याने त्यांच्या डोक्यावर व डोळ्याला इजा झाली. सदर घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी शेतकऱ्यास रुग्णालयात उपचारासाठी नेले.

दरम्यान शेतीचे दिवस सुरू झाल्याने रानडुकरांचा धुमाकूळ वाढत असल्यामुळे शेतीची कामे करावे की जीव वाचवावा अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. शिवाय रानडुक्कर शेती पिकांचे नुकसान करत आहेत. याबाबत वन विभागाने योग्य ती दखल घेऊन रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.