जळगाव जिल्ह्यातील मंत्र्यांना मिळाली ‘हि’ खाती
जळगाव लाईव्ह न्यूज ।15 जुलै २०२२ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी तीन दिवस मध्यरात्री बैठका पार पडल्यानंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले आहे. यावेळी अजित पवार यांनी अर्थ खात देण्यात आल आहे. तर मंत्री अनिल भाईदास पाटील यांना मदत आणि पुनर्वसन खात मिळालं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर हा खाते वाटपाचा तिढा सुटला. अर्थ खातं आपल्याकडे घेण्यास अजित पवार यशस्वी ठरले आहेत
जळगाव जिल्ह्यातील मंत्री अनिल भाईदास पाटील यांना मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन खात मिळालं आहे.तर गिरीश महाजन यांना ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन हि खाती मिळाली आहेत. याच बरोबर मंत्री गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा व स्वच्छता हे खात मिळालं आहे.
राष्ट्रवादीला मिळालेली खाती
अजित पवार – अर्थ, नियोजन
छगन भुजबळ – अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण
धर्मरावबाबा अत्राम- औषध व प्रशासन
दिलीप वळसे पाटील – सहकार
धनंजय मुंडे – कृषी
हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
अनिल पाटील – मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन
आदिती तटकरे- महिला आणि बालकल्याण
संजय बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे