जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२३ । आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोने पुन्हा एकदा भरारी घेण्याची शक्यता आहे. तर सोन्यापाठोपाठ चांदीचा भावही वाढू शकतो. मागील काही दिवसापासून सोन्याचा दर 58 हजाराच्या आत होता. मात्र आता सोन्याच्या किमतीने 59 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. चांदीचा दर देखील 73 हजारावर गेली आहे.
जळगावातील नवीन दर काय?
जळगाव सुवर्ण नगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव विनाजीएसटी 54,300 रुपये.गेल्या दोन तीन दिवसात 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत 300 ते 400 रुपयाची वाढ झाली आहे.
24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव विनाजीएसटी 59,500 रुपयापर्यंत आहे. काल सकाळच्या सत्रात सोन्याचा दर 59,300 रुपयावर होता. दुसरीकडे चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. काल सकाळच्या सत्रात 72000 हजारांवर असलेली चांदी आता 73000 हजारावर गेली आहे. जळगावात सध्या चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी जवळपास 73,500 रुपयावर आहे. गेल्या २४ तासात चांदीच्या किमतीत 1000 ते 1500 रुपयाची वाढ झालेली दिसून येतेय.
मल्टी कमोडिटी एक्सचेंवरील आजचा सोने-चांदीचा दर?
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर, आज गुरुवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याचा भाव किंचित 70 रुपयांनी वाढून 59,256 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. याशिवाय चांदीचा भाव 225 रुपयांनी वाढून तो 73,771 रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यवहार करत आहे. यापूर्वी काल सकाळच्या दरम्यान, चांदीचा दर 71200 रुपयांच्या आसपास होता.
दरम्यान, जुलै महिन्यात खऱ्या अर्थाने सोने आगेकूच करत आहे. गेल्या दोन महिन्यात, मे आणि जून मध्ये किंमतीत मोठी तफावत दिसली नाही. भावात चढउतार होता. पण दर घसरणीवरच होते. जुलै महिन्यात सोन्याने मोठा पल्ला गाठला. एक हजार रुपयांची दरवाढ झाली.