ठाकरे गटातर्फे अर्वाच्य विधान करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांचा जोडे मारून निषेध
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२२ । जळगावात ठाकरे गटाच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अर्वाच्य विधान करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रवी राणा व निलेश राणे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
जळगाव शहरातील महानगरपालिकेच्या मुख्य द्वारावर हे आंदोलन करण्यात आले. शिवसेना तर्फे मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेना पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आंदोलन झाले. यावेळी पक्षप्रमुखांविरुद्ध बोलणाऱ्या नेत्यांच्या चेहऱ्यावर शाई देखील फेकण्यात आली.
यावेळी शिवसेना सहसंपरक प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, समन्वयक अंकुश कोळी, जकिर पठाण, उप जिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, तालुका प्रमुख उमेश पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश पाटील, उप महानगर प्रमुख गणेश गायकवाड, मानसिंग सोनवणे, प्रशांत सुरळकर, पिंटू सपकाळे, फरीद खान, शाकीर शेख, किरण भावसार, महिला आघाडी महानगर प्रमुख मनीषा पाटील, नीलू इंगळे, निता संगोळे, युवासेना जिल्हाप्रमुख पियूष गांधी, उप जिल्हाप्रमुख विशाल वाणी, महानगर प्रमुख यश सपकाळे, अमोल मोरे, महेश ठाकूर, डॉ जुबेर शेख, संजय सांगळे, आबिद खान, बजरंग सपकाळे, श्रीकांत आगळे, शोएब खाटीक, सलीम खातिक, जमीर नागरी, विजय राठोड, राजेश वारके, शैलेश काळे, सचिन पाटील, निलेश ठाकरे, किरण पवार, इमाम पिंजारी, विनोद सपकाळे, योगेश चौधरी, सलीम शेख आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते