जळगाव लाईव्ह न्यूज | ११ जुलै २०२३ | लोकसभेत यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रथमच खासदार बनून निवडून गेलेल्या खासदारांच्या कामगिरीचा आढावा एका सर्वेक्षणातून घेण्यात आला आहे. या सर्वेक्षणात जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपाचे खासदार उन्मेष पाटील यांचा टॉप १० मध्ये समावेश आहे. या यादीत राष्ट्रवादीचे खासदार आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी डॉ. अमोल कोल्हे यांचा देशात तिसरा क्रमांक आला आहे.
१७ व्या लोकसभेत एकूण २७० खासदारांनी प्रथमच संसदेत एंट्री केली. जी आतापर्यंतची सर्वाधिक आहे. त्यांच्यापैकी बरेच जण सातत्याने चांगली कामगिरी करत असल्याचे पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्च या स्वतंत्र संस्थेने गोळा केलेल्या आकडेवारीने समोर आले आहे. खासदारांच्या टॉप १० यादीत पाच भाजपचे आहेत, तर यादीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन आणि शिवसेनेच्या एका खासदाराचाही समावेश आहे.
या यादीत काँग्रसेच खासदार कुलदीप राज शर्मा यांचा पहिला क्रमांक असून त्यांना ८६४ गुण आहेत. भाजपाच्या सुकांता मुजामदार यांचा दुसरा क्रमाक लागतो, त्यांना ५८८ गुण आहेत. तर, ५५४ गुणांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा तिसरा क्रमांक आहे. तर ४६० गुणांसह भाजपाचे उन्मेष पाटील दहाव्या क्रमांकावर आहेत.
काही नवीन खासदारांनीही सर्व लोकसभा खासदारांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. मंत्री न झालेल्या 250 नवोदित सदस्यांसाठी संकलित केलेल्या डेटावरून असे दिसून आले आहे की त्यांनी 41,104 प्रश्न विचारले, 685 खाजगी सदस्यांची विधेयके आणली (जी सरकारने नव्हे तर खासदारांनी आणली), आणि सभागृह नियम 377 अंतर्गत 1,908 महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले.