काँग्रेसच्या ‘त्या’ बहुचर्चीत पोस्टरमुळे पेटला वाद : गुन्हा दाखल !
आधी पडलेली शिवसेनेतली फुट आणी त्या नंतर अजीत पवार यांच बंड यामुळे राज्यातील राजकारण चांगलच तापल आहे. दरम्यान मुंबईत लागलेल काँग्रेसचे पोस्टर संपुर्ण राज्यात चर्चेचा विशय ठरत आहे.
मात्र पोलिसांनी काँग्रेस मीडिया प्रभारी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वांद्रे पश्चिम येथील जनरल अरुण कुमार वैद्य गार्डन येथे पोस्टर लावण्यात आले होते. या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्या वादग्रस्त पोस्टर मध्ये ‘काँग्रेस का हाथ खुद्दार के साथ, भाजपा का साथ गद्दर के साथ’ आशयाचे मजकूर होते. चारही पक्षांतील प्रमुख नेत्यांच्या फोटोसह आमदार झीशान सिद्दीकी आणि मुंबई प्रदेश युवक काँग्रेसचे मीडिया प्रभारी विजय गोरे यांच्या नावांचा बॅनरवर उल्लेख करम्यात आला होता.
वांद्रे पोलिस ठाण्यात आयपीसी कायद्याच्या कलम 34 आणि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अॅक्टच्या कलम 3 नुसार गुन्हा दाखल केला आहे. बॅनर परवानगीशिवाय लावण्यात आले आणि त्यात विरोधाभासी मजकूर असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.