महाराष्ट्रराजकारण
राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट !
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२२ । राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची भेट घेतली.यावेळी ही भेट नक्की का झालीय़ हे आजुन स्पष्ट नाहीये.मात्र ही भेट राजकीय अर्थाने अतीशय महत्वाची आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते. मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे हे देखील सोबत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये गेल्यावर राज्यातील राजकारण अस्थिर झाल्याचं दिसत आहे. यामुळे ही भेट राजकीय अर्थाने अतीशय महत्वाची आहे.महापालिकेच्या निवडणुकांसाठी देखील राज्यातील पक्षांनी तयारी सुरु केल्या आहेत. त्यादृष्टीनं राज्यात काही नवी राजकीय समिकरणंही मांडली जाऊ शकतात. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीकडं पाहिलं जात आहे.