⁠ 
[rank_math_breadcrumb]

महामार्गावर भीषण अपघात : ९ जण जागीच ठार, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२३ । राज्यात अपघातांची मालिका कायम असून आज पुन्हा एक अपघात झाला आहे. या अपघातात ९ हुन अधिक जण ठार झाले आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहे. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ घडली आहे.

शिरपूरजवळील पळासनेर बायपासवर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव कंटनेरचे अचानक ब्रेक निकामी झाल्यानंतर कंटेनर दोन वाहनांना उडवले व त्यानंतर कंटेनर हॉटेलमध्ये शिरल्यानंतर हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेल्या ग्राहकांसह वेटर व अन्य नागरीक मिळून ९ हून अधिक जणांचा मृत्यू ओढवला. मृतांचा आकडा अजून वाढण्याची भीती आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहे.

 या अपघातातील जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती कळताच पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, पोलीस निरीक्षक अंगद आसटकर यांच्यासह पोलिसांनी धाव घेत मदतकार्याला वेग दिला आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह