जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२१ । कोरोनानंतर आता जळगाव जिल्ह्यावर म्युकरमायकोसिसचे संकट घोंगावत आहे. जळगाव जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात येत आहे. रुग्णालयातील ७ नंबर वॉर्डमध्ये १० बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. या संदर्भात समिती स्थापन करण्यात आली असून या समितीद्वारे रुग्णांची काळजी घेतली जाणार आहे. वॉर्डातील कोरोनाचे रुग्ण डिस्चार्ज झाल्यानंतर याठिकाणी म्युकरमायकोसिसचे रुग्ण दाखल करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे.