⁠ 
मंगळवार, मे 21, 2024

जळगाव जिल्ह्यातील चेकपोस्टवरील तपासणी अधिक कठोर होणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२१ । जळगाव जिल्ह्यात ज्या तालुक्यांची सीमा थेट परराज्यांशी संलग्न आहेत. इतर जिल्हा संलग्न आहेत. त्या ठिकाणच्या चेकपोस्टवर जळगाव जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या परराज्यातील व्यक्तीचा आरटीपीसीआर अहवाल निगेटीव्ह आहे की नाही हे तपासावे, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

तहसीलदारांकडून एक विशेष कार्यकारी अधिकारी नेमून संबंधित चेक पोस्टवर स्थानिक पोलिसांच्या मदतीने तपासणी पथक नेमण्यात येणार आहे. राज्याबाहेरील कोणत्याही व्यक्तीस तसेच वस्तू, सेवांची वाहतूक करणाऱ्या वाहनाचे चालक व सहाय्यक चालक यांना महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटीव्ह अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार नियामाची अंमलबजावणी व्हावी असे जिल्ह्याधिकाऱ्यानी आपल्या आदेशात म्हटले आहे.