⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या कोणत्या गटाचे वर्चस्व ठाकरे की शिंदे?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । महाराष्ट्रात झालेल्या अभूतपूर्व सत्ता परिवर्तनानंतर शिवसेना हा पक्ष दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. शिवसेना पक्ष आता शिंदे आणि ठाकरे या दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. अशावेळी जळगाव जिल्ह्यात नक्की कोणत्या गटाची ताकद मोठी हा प्रश्न कित्येकांना पडला असेलच. तर पाहूयात नक्की जळगाव जिल्ह्यात कोणता गट वर्चस्व प्रस्थापित करू पाहतो आहे. (shinde vs thakre in jalgaon)

जळगाव जिल्ह्यात 11 मतदारसंघ असून यापैकी 5 आमदार हे शिवसेनेचे आहेत. जळगाव जिल्ह्यात पाहायला गेलो तर सर्वाधिक आमदार असलेला पक्ष हा शिवसेनाच आहे. सध्या शिवसेनेचे पाचही आमदार हे शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहेत. जी अधिकृत शिवसेना आहे.

आमदाराच्या दृष्टिकोनाने पाहिलं तर शिंदे गट हा वर्चस्व निर्माण करत आहे. जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रामध्ये देखील ठाकरे गटापेक्षा शिंदे गटाचे वर्चस्व अधिक आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद यामध्येही शिंदे गट हा ठाकरे गटापेक्षा बराच पुढे आहे. अशावेळी येत्या काळात ठाकरे गटाचा जळगाव जिल्ह्यात सुपडा साफ होतो की काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

मात्र ठाकरे गटाकडे असलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे अखंडित शिवसेनेतील 70 टक्के पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे अजूनही ठाकरे गटांसोबतच आहेत. आमदार किंवा लोकप्रतिनिधी जरी शिंदे गटासोबत असले तरी त्यांच्या जागी दुसरा पर्याय उभा करण्याची संधी आता ठाकरे गट गमवत नसून दुसरा पर्याय उभा करत आहे.

शिवसेना पक्ष हा रस्त्यावरचा पक्ष आहे. अशावेळी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्यांची संख्या ही ठाकरे गटाकडे जास्त आहे. याचबरोबर नागरिकांकडून ठाकरे गटाला मिळत असलेली सहानुभूती हे देखील ठाकरे गटाच्या पत्थी पडणारी गोष्ट आहे.(shivsainiks with thakre and shinde)

वर्षभरावर विधानसभा आणि लोकसभा निवडणुका येऊन थापल्या आहेत. अशा वेळी या क्षणाला जिल्ह्यामध्ये सत्तेत असल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणावर जिल्ह्याचा विकास करत असल्याचे सांगत असल्यामुळे शिंदे गट हा ठाकरे गटापेक्षा जरा मोठाच दिसत आहे. (old shivsena with thakre)

मात्र ऐन निवडणुकीत काही ना काही वेगळे चित्र दिसेल अशी सध्या राजकीय चर्चा सुरू आहे. यामुळे येत्या काळात जळगाव जिल्ह्यात जनता नक्की कोणाला साथ देते शिंदे गटाला की ठाकरे गटाला? हे पाहणं अतिशय उत्सुकतेचं ठरणार आहे.