---Advertisement---
गुन्हे एरंडोल

Erandol : दोन शिक्षकांकडून लाच मागून अ‍ॅडव्हान्समध्ये धनादेश स्वीकारणार्‍या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांसह तिघांना पकडले

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२३ । जळगाव जिल्ह्यात आठवड्यातून एक तरी लाचखोरीची घटना समोर येत आहे. अशातच होणारी बदली थांबवण्यासाठी दोन शिक्षकांकडून धनादेशापोटी 75 हजारांची लाच मागून अ‍ॅडव्हान्समध्ये धनादेश स्वीकारणार्‍या एरंडोल शहरातील सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांसह मुख्याध्यापक व वरीष्ठ लिपिक जाळ्यात अडकला आहे. एसीबीच्या पथकाच्या या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

lach jpg webp webp

विनोद शंकर जाधव (वय-४२ वर्ष, मुख्याध्यापक, महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल ता.एरंडोल जि.जळगाव, रा.योगेश्वर नगर,कजगाव रोड,पारोळा, नरेंद्र उत्तम वाघ, वय-४४ वर्ष, कनिष्ठ लिपीक, महात्मा फुले हायस्कुल,एरंडोल, रा.समर्थ नगर,भडगाव रोड,पाचोरा, विजय पंढरीनाथ महाजन, वय-५६ वर्ष, अध्यक्ष, श्री.सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ,जळगाव संचलीत महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल रा.माळी वाडा, एरंडोल, ता.एरंडोल जि.जळगाव असं लाचखोरांची नावे आहेत.

---Advertisement---

यातील तक्रारदार हे श्री.सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ,जळगाव संचलीत महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल येथे उप शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. सदर संस्थेने तक्रारदार यांची व त्यांचे उप शिक्षक या पदावर कार्यरत असलेले सहकारी मित्र अशा दोघांची बदली दि.०१/०४/२०२३ रोजी एरंडोल हायस्कूल येथून महात्मा फुले हायस्कुल,धरणगाव येथे करण्यात आल्या बाबतचा मंजुरीसाठीचा प्रस्ताव दि.०२/०५/२०२३ रोजी शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग,जिल्हा परिषद जळगाव यांचे कडे पाठविलेला होता.

सदर तक्रारदार यांची व त्यांचे सहकारी उप शिक्षक मित्र अशा दोघांची बदलीस स्थगिती मिळणेसाठी व पाठवलेला मंजुरी प्रस्ताव रद्द करण्यात यावा अशा आशयाचे संस्थेचे पत्र शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग,जिल्हा परिषद जळगाव यांचे नावे देण्याच्या मोबदल्यात मुख्याध्यापक विनोद जाधव आणि कनिष्ठ लिपिक नरेंद्र उत्तम वाघ यांच्याकडे व त्यांचे सहकारी उप शिक्षक यांचेकडे पंचासमक्ष स्वतःसाठी अध्यक्ष विजय महाजन यांच्यासाठी दोघांचा पुर्ण महिन्याचा एक पगार म्हणजेच तक्रारदार यांना ७५,०००/-रुपये चेक स्वरूपाने लाचेची मागणी करून ती चेक स्वरूपात घेणार असल्याचे सांगितले.

अध्यक्ष विजय महाजन यांनी कनिष्ठ लिपिक नरेंद्र उत्तम वाघ यांच्या मोबाईल फोनवरून तक्रारदार यांना मुख्याधापक विनोद जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्तता करण्यास सांगून प्राप्त करण्याचा प्रयत्न करून प्रोत्साहन दिले. व मागणी केल्याप्रमाणे ७५,०००/-रू.चा मुख्याध्यापक यांचे नावे असलेला चेक विनोद जाधव यांनी महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल येथे स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यांच्यावर एरंडोल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---