जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुने २०२३ । जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. अशातच बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यात घडलीय. नराधम बापाने आपल्या अवघ्या नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली असून याबाबत संशयित नराधम पित्यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून गुन्हा दाखल केला आहे.
नेमका प्रकार काय?
चाळीसगाव तालुक्यातील एका गावात पीडित मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत राहते. तिच्या घरची हलाखीची परिस्थिती असून पीडित मुलीची आई आजारी असल्याने व घरात सलाईन लावण्यासाठी जागा नसल्याने दिराच्या घरी सलाईन लावण्यासाठी गेल्याने नऊ वर्षीय चिमुकली घरात एकटी असतानाच नराधम बापाने तिच्यावर अतिप्रसंग केला.
आई घरी आल्यावर घाबरलेल्या पीडीतेने हा प्रकार सांगितला. दिड महिन्यापूर्वीही या नराधम बापाने असाच प्रकार केल्याची माहिती पीडिताने सांगितल्यानंतर सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. या प्रकाराचा जाब घरच्या लोकांनी विचारल्यानंतर हा नराधम पळाला. याबाबत पीडीतेच्या आईने चाळीसगाव शहर पोलिसात सोमवारी रात्री तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. नराधम पित्याला अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस करीत आहेत.