जळगाव जिल्हाजळगाव शहर
चोरट्यांचा कहर : बंद घरातील दरवाजेच..!
जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जून २०२३ । भुसावळ शहरातील कन्हाळा रोडवरील कृष्णा पार्कमध्ये घरफोडीची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी बंद घरातील चक्क दरवाजांसह अन्य साहित्य लांबवल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
योगेश शंकर विचवे (33, विचवा, ता.बोदवड) हे नोकरदार असून त्यांची कृष्णापार्कमध्ये घर आहे. 24 ते 29 दरम्यान घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत घरातील तीन हजार रुपये किंमतीचे दोन लाकडी दरवाजे, दिड हजार रुपयांचा एक लाकडी दरवाजा, एक हजार रुपये किंमतीचा बाथरूमचा फायबरचा दरवाजा, दोन स्टीलचे नळ तसेच पाण्याची टाकी असा एकूण नऊ हजार पाचशे रुपयांचा सामान लांबवला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. तपास नाईक यासीन सत्तार पिंजारी करीत आहेत.