जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२३ । कापसाला भाव मिळत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. अश्यावेळी युवासेनेच्या वतीने (ठाकरे गट) जामनेरमध्ये कापसाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.यावेळी नागरिकांनी या आंदोलना चांगला प्रतिसाद दिला.
शेतकऱ्यांचा अंत न पाहता शासनाने कापसाला भाव द्यावा, अन्यथा दहा दिवसानंतर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी युवासेनेने दिला. युवासेना (उद्धव ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख राहुल चव्हाण, तालुका प्रमुख नरेंद्र धुमाळ, विशाल जंजाळ, भैया गुजर, अतुल सोनवणे, सुरेश चव्हाण, मनोज मिस्तरी, सईद शेख, मयूर पाटील, अनिल चौधरी, भूषण कानळजे, योगेश गोसावी, सागर साठे यांचेसह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
कापसाला भाव मिळाला पाहिजे, भाव देणे शक्य नसेल तर पेरणीसाठी प्रति एकर ५ हजार अनुदान द्यावे, शासनाने शेतकऱ्यांचा विमा काढावा, बाजार समितीत हमी भावाने शेती मालाची खरेदी करावी, या मागण्याचे निवेदन तहसीलदार नानासाहेब आगळे यांना देण्यात आले.