⁠ 
रविवार, मे 19, 2024

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवणाऱ्या हद्दपार संशयिताला पोलिसांनी केली अटक !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२३ । येवला एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्याला चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सापळा रचून दर्गा परिसरातून त्यास अटक केली. येवला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

शहरातील दर्गा परिसरात रात्री शहर पोलीस गस्त घालत होते. यावेळी त्यांना एक इसम एका अल्पवयीन मुलीसोबत असल्याचे पाहायला मिळाले.

अमोल उर्फ भावड्या दिलीप वाघ (वय-२४) रा. राजापुर ता. येवला जि. नाशिक असे सांगितले. मात्र सदर अल्पवयीन मुलीविषयी पोलिसांनी माहिती विचारली. परंतु त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर शहर पोलिसांनी येवला येथील पोलिस स्थानक जि. नाशिक येथे संपर्क साधुन त्याचे व अल्पवयीन मुलीबाबत माहीती घेतली असता त्याने अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवुन नेलेबाबत येवला पोलीस स्थानकात भादवि कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल असल्याचे कळाले.

इतर ३ गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेला आरोपी असल्याची माहीती प्राप्त झाली. सदर आरोपीच्या ताब्यात एक मोटारसायकल देखील मिळुन आलेली आहे. ती मोटारसायकल सुध्दा चोरीची असल्याची माहीती प्राप्त असुन त्याबाबत गुन्हा दाखल आहे. सदर संशयितावर यापुर्वी शरिराविरुध्दचे व मालाविरुध्दचे एकुण ६ गुन्हे दाखल असुन त्यास माहे आँगस्ट-२२ पासुन नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातुन हद्दपार केल्याबाबतची माहीती समोर आली असून दोघांनाही येवला तालुका पोलीस स्थानकाचे पोलीस अंमलदार यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.