आपल्या देशाला लहरी राजा लाभला आहे – संजय राऊत
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२३ । या देशाला एक लहरी राजा मिळाला आहे.दोन हजारांच्या नोटा वितरणातून मागे घेणं हा तसाच निर्णय आहे. लहरी राजा असेच निर्णय घेणार आहे. हे गृहीत धरुन आपण २०२४ चा काळ ढकलणार आहोत अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.
कर्नाटकमधला भाजपाचा पराभव अत्यंत दारुण आहे. भाजपाला देशाची मानसिकता काय झाली आहे हे दाखवून देणारा निकाल आहे.. कर्नाटकसारख्या राज्यात हिंदूंचे सर्वाधिक सण आणि उत्सव साजरे केले जातात. या हिंदुत्ववादी राज्याने, श्रद्धाळू राज्याने नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपाचा पराभव केला आहे. हे सत्य भाजपाचे लोक का स्वीकारत नाहीत? असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. असेच पराभव तुमच्या वाट्याला येणार आहेत.
मुंबई महापालिका, ठाणे महापालिकांसह १४ महापालिकांच्या निवडणुका घेण्याची हिंमत तुम्ही का दाखवत नाही? मोदींना प्रचाराला येऊदेत, अमित शाह यांना प्रचार करु दे आणखी कुणालाही येऊदेत. इथे तंबू ठोकून बसलात तरी आमचं काही म्हणणं नाही. निवडणुका घ्या ही आमची मागणी आहे.