जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२३ । सोने आणि चांदीच्या किमतीत चढउतार सुरूच आहे. मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या घसरणीने जळगावात विनाजीएसटी सोन्याचा दर 60 हजाराच्या घरात आला होता. मात्र काल मोठी वाढ झालेली दिसून आलीय. त्यामुळे सोन्याचा किमतीने पुन्हा एकदा 61 हजार रुपयाचा टप्पा ओलांडला आहे. सोबतच चांदीच्या किमतीत देखील मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, आज सुट्टी असल्यामुळे दर जाहीर होत नाही. Gold Silver Rate 21 May 2023
जळगावमधील (Jalgaon) सुवर्णनगरीत 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर जीसीएसटीसह 63 हजारावर गेला आहे. तर विनाजीएसटी सोन्याचा दर 61,600 रुपये इतका आहे. यापूर्वी सोन्याचा दर 60,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. मात्र त्यात आता जवळपास 800 रुपयाची मोठी वाढ झालेली दिसून येत आहे.
दुसरीकडे चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी 73,800 रुपयांवर विकले जात आहे. यापूर्वी चांदीचा दर 72,600 रुपयावर विकला जात होता. मात्र त्यात काल शनिवारी 1200 ते 1300 रुपयापर्यंतची मोठी वाढ झालेली दिसून येत आहे.