जळगाव लाईव्ह न्यूज | १९ मे २०२३ । सध्या उन्हाळी सुट्या तसेच लग्नसराईचे दिवस सुरु असून या दरम्यान, रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अशातच भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस उद्या म्हणजेच 20 मे पासून एक महिना रद्द करण्यात आली आहे. ही गाडी भुसावळ ते इगतपुरीपर्यंत धावणार आहे.यामुळे भुसावळ विभागातून या गाडीने पुणे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होईल.
भुसावळ विभागातून पुण्याला जाण्यासाठी व येण्यासाठी भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेसला अनेकांची पसंती मिळते. यापूर्वी ही गाडी २८ जानेवारी ते १ एप्रिल २०२३ अशी तब्बल दोन महिने बंद होती. तेव्हा रेल्वे प्रशासनाने ब्लॉकचे कारण दिले होते. यानंतर ती ट्रॅकवर आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.
मात्र, आता मुंबई विभागातील कामानिमित्त केवळ ३८ दिवसातच ही गाडी तब्बल एक महिना शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली. त्यानुसार भुसावळ येथून रात्री १२.३० वाजता सुटणारी गाडी फक्त इगतपुरीपर्यंत चालवण्यात येईल. इगतपुरीच्या पुढे कल्याण, पनवेल, लोणावळा, पुण्यापर्यंत ही गाडी चालवली जाणार नाही.. इगतपुरीत दिवसभर थांबून नियमित परतीच्यावेळी भुसावळकडे प्रवास सुरू होईल.
गाडीला मेमूचे रॅक जोडणार
महिनाभार इगतपुरीपर्यंत धावणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेसला नेहमीप्रमाणे बोगी नसतील. त्याऐवजी या गाडीला मेमू रेक (डबे ) जोडण्यात येतील. यामुळे प्रवाशांची अजूनच गैरसोय होणार आहे. कारण, या डब्यांची आसन क्षमता अतिशय कमी आहे