जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२३ । तरुणीसह तिच्या भावाला मारहाण करीत त्यांच्याकडील किंमती ऐवज असलेली पर्स लांबवणार्या दोघा आरोपी पती-पत्नीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. संजना फरहान शेख व फरहान शब्बीर शेख असे अटकेतील दाम्पत्याची नावे आहेत.
जळगावच्या तांबापुरा परीसरातील गौतमनगरात जुन्या वादातून आरोपींनी एका दाम्पत्यास मारहाण करीत त्यांच्याकडील रोकड तसेच दागिणे असलेली 33 हजारांचा ऐवज असलेली पर्स लांबवल्याने एमआयडीसी पोलिसात यात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गौतम नगराताील तबस्सुम आरा इक्बाल खान (21) यांच्या तक्रारीनुसार, त्या एका रुग्णालयात अकाउंटंट असून 9 रोजी रात्री साडेआठ वाजता घराकडे येत असताना संशयित संजना फरहान शेख व तिचा पती फरहान शब्बीर शेख (दोन्ही रा.तांबापुरा) यांनी अडवत तुझी आईला समजावून सांग, ती आमच्याविरोधात तक्रार का देते? असे सांगितल्याने त्यांना तक्रारदार समजावत असताना संजना हिने तबस्सुम हिच्या डाव्या हाताच्या दंडाला चावा घेत दुखापत केली तर यावेळी तबस्सुम यांचा भाऊ अमजद आल्यानंतर त्यास फरहाने याने मारहाण करीत दोघा आरोपींनी तक्रारदाची पर्स लांबवली.
या पर्समध्ये दोन हजार 700 रुपयांची रोकड व चांदीची अंगठी असा तीन हजार तीनशे रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी तबस्सुम खान यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयित संजना शेख व फरहान शेख यांना अक करण्यात आली व गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला.