जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२३ । जळगाव जिल्ह्यातील आठवडे बाजारात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर झाले असे कि, व्यापारी दुकान बंद करून घरी निघण्याच्या तयारीत असतानाच पाळत ठेवून असलेल्या व तोंडाला रूमाल बांधललेया त्रिकूटाने चाकू व गावठी कट्टा लावून व्यापार्यास ‘जो कुछ है निकालो’म्हणून धमकावले आहे.
पुढे व्यापार्याने प्रतिसाद न दिल्याने आरोपींनी व्यापार्याच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची चैन (माळ) तोडत दुचाकीवरून पळ काढला. या घटनेत सुदैवाने निम्म्याहून अधिक तुटलेली सोन्याची माळ व्यापार्याकडे राहिल्याने मोठे नुकसान टळले बुधवारी रात्रीच्या सुमारास भर बाजारपेठेत घडलेल्या या प्रकाराने शहरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली.
भुसावळ शहरातील आठवडे बाजार भागात शहरातील व्यापारी मोहन चावराई यांचे गणेश ट्रेडर्स नामक आहे. बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांनी दुकान बंद केले व दुकानाला नमस्कार करून बाहेर पडणार तोच तोंडाला रूमाल बांधून आलेल्या 25 ते 30 वयोगटातील तीन तरुणांनी व्यापार्याला चाकू व गावठी कट्टा लावत धमकावले. तुम्हारे पास जो भी है निकालो म्हणून व्यापार्याला धमकावल्याने व्यापारी काही वेळ घाबरला मात्र त्यांनी रोकड असलेली पिशवी न सोडल्याने आरोपींनी व्यापार्याच्या गळ्यातील सुमारे तीन तोळे वजनाची माळ तोडली मात्र गडबडीत या सोन्याच्या माळचा काही भागच आरोपींच्या हातात आल्याने संशयित दुचाकीवरून सुसाट वेगाने पसार झाले. या घटनेची माहिती व्यापार्याने सुरूवातीला कुटूंबाला दिली व काही वेळेतच मार्केटमध्ये ही घटना कळताच व्यापारीदेखील धास्तावले.
पोलीस अधिकार्यांची धाव
भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठचे प्रभारी निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचार्यांनी धाव घेत व्यापार्याशी चर्चा केली व नेमका घडलेला प्रकार जाणून घेतला. बुधवार सायंकाळपर्यंत व्यापार्याला या बाबत तक्रार देण्याचे सूचित करूनही व्यापार्याने तक्रार दिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
तीनही आरोपींच्या पोलिसांच्या नजरेत
व्यापार्याने सांगितलेल्या वर्णनावरून संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे. संशयित शहरातील असल्याचा पोलीस यंत्रणेला संशय आहे. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह संशयितांचे वर्णन स्पष्ट होण्यासाठी पोलिसांनी या भागातील व्यापार्यांच्या दुकानातून सीसीटीव्ही फुटेज संकलीत केले आहेत. संशयित पोलिसांच्या नजरेत असून त्यांना लवकरच अटक करू, असा विश्वास पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी व्यक्त केला.