जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२३ । राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. शिवसेनेच्या आमदार लता सोनवणे यांच्या कन्येच्या विवाह सोहळा आज पार पडत आहे. या सोहळ्याला ते हजेरी लावणार आहेत.
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी शासकीय विमानाने मुंबई येथून जळगाव विमानतळावर आगमन होणार आहे. यासंदर्भातला दौरा जिल्हा प्रशासनाला मंगळवारी सायंकाळी उशिरा प्राप्त झाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील चोपड्याच्या आमदार लता सोनवणे यांची कन्या अमृता सोनावणे हिचा विवाह सोहळा जळगावातील एम. जे. कॉलेजच्या एकलव्य क्रीडा मैदानावर होत आहे. या विवाह सोहळ्याला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची हजेरी राहणार आहेत