दिल्लीहून रिपोर्ट आला : शिंदे गटाला किती जागा मिळणार ?
जळगाव लाईव्ह न्यूज | ७ मे २०२३ | २०२४ची लोकसभा निवडणूक आता एका वर्षावर आली आहे. पर्यायी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यातच शिवसेना आणि भाजप नक्की किती जागा लढणार ? यासाठी दिल्लीहून रिपोर्ट आला असल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व 48 सीट या शिवसेना, भाजप युतीने मजबुतीने लढायच्या आहेत. यासाठी सर्वेक्षण केले जाणार असून, त्यानंतर कोणाला कोणती जागा याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं दिल्लीचा आदेश असल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व 48 सीट या शिवसेना, भाजप युतीने मजबुतीने लढायच्या आहेत, असा दिल्लीचा आदेश असल्याचं शिरसाट म्हणाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची जागा सर्वेक्षणानंतर ही सीट कोण जिंकू शकेल, याचा अंदाज आल्यानंतर त्या पक्षाला आणि नेत्याला उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे या जागेवरून कोणताही वाद वैगरे आमच्यात नाही. असेही शिरसाठ म्हणाले.