11 ते 13 मे दरम्यान राज्यात काय होईल ते सांगता येणार नाही
जळगाव लाईव्ह न्यूज | ७ मे २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली होती. ही भेट स्नेहभोजनासाठी होती असंही मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलं होत. मात्र, सुषमा अंधारे यांनी या भेटीवर मोठं विधान केलं आहे.
यावेळी त्या म्हणाले कि, राज्यपालांकडे डिनर डिप्लोमसीला जाऊन आले. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. या घडामोडीतून बरेच राजकीय संकेत येत आहेत. येत्या 11 ते 13 मे दरम्यान राज्यात काय होईल ते सांगता येणार नाही. डिनर डिप्लोमसीनंतर देवेंद्र फडणवीस यांना धक्का लागला तरी आश्चर्य वाटणार नाही असं अंधारे म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीस पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. फडणवीसांच्या उठाठेवीमुळे पक्षाची इमेज खराब झाली आहे. एकनाथ शिंदेशी हातमिळवणी केल्यामुळे पक्षांची इमेज खराब झाली आहे, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.