जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२३ । वाळू वाहतूक करणार्या ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने 20 तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी पाचोरा भडगाव रोडवरील हॉटेल स्वप्नशिल्प समोर घडली. पवन हिम्मत पाटील (वय – २०) असं मृत तरुणाचे नाव असून या तरुणाच्या मृत्यूने परिसरावर शोककळा पसरली आहे.
नेमकी काय आहे घटना?
पाचोरा तालुक्यातील चिंचखेडा खु येथे राहणार पवन हिम्मत पाटील हा ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत होता. पवन हा आई वडीलास एकुलता एक मुलगा होता. शनिवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान गिरणा नदीपात्रातून वाळू भरुन पाचोरा शहराकडे भरधाव वेगाने येत असतांना हॉटेल स्वप्नशिल्प समोर अचानक टायर फुटला.
चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रॉक्टर चांदवड – जळगाव महामार्गावरील इलेक्ट्रीक खांबावर आदळले व पल्टी झाले. यात पवनच्या डोक्याला व चेहर्याला जबरी मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधीत वाहन मालक व त्याच्या साथीदारांनी तात्काळ तुटलेला खांब व वाळू दुसर्या वाहनात भरुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पवन यास एक बहिण व वृद्ध आई – वडील असा परिवार आहे.
दरम्यान, पवन पाटील याच्या मृत्यूची बातमी गावात कळताच परिसरावर शोककळा पसरली आहे.