जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२३ । राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक सुरू झाली असून या बैठकीत राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीने शरद पवार यांचा राजीनामा फेटाळून लावण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहणार आहे. मात्र आता शरद पवार समितीच्या निर्णयाची अंमलबजावणी करतात की स्वत:च फेटाळून लावतात, हे पाहणे गरजेचं आहे
शरद पवार अध्यक्षपदी कायम राहिल्यानंतर मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर जल्लोषाचे वातावरण आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
गेल्या काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. त्यानंतर पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित करण्यासाठी शरद पवार यांनी 18 सदस्यीय समिती स्थापन केली होती. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह मोठे नेते मंडळीत हजर होते.
या बैठकीत शरद पवार हेच अध्यक्ष राहतील असा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी मीडियाशी संवाद साधत शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष राहतील असं पटेल यांनी जाहीर केलं. त्यामुळे शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदी राहणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं आहे.