⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | ग्राहकांना मोठा झटका ! सोने नव्या रेकॉर्डच्या दिशेने, चांदी 1000 रुपयांनी वधारली..

ग्राहकांना मोठा झटका ! सोने नव्या रेकॉर्डच्या दिशेने, चांदी 1000 रुपयांनी वधारली..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह । ४ मे २०२३ । आजकाल सोन्या-चांदीच्या किमतीत बरेच चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या महिन्याच्या पंधरवड्यात सोन्याच्या किमतीने नवीन रेकॉर्ड बनवला होता. त्यांनतर काहीशी घसरण झाली होती. मात्र आता सोन्याच्या दरात मोठी झेप घेतली आहे. सोने पुन्हा 61 हजारांवर गेलं आहे. यासोबतच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.

जळगावातील आजचा सोन्याचा दर? Gold Rate Today
जळगाव सुवर्ण नगरीत सध्या सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 61,400 ते 61,500 रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका आहे. यापूर्वी गेल्या सकाळच्या सत्रात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 60,500 रुपये इतका होता. त्यात म्हणजेच एका दिवसात 900 ते 1000 रुपयाची वाढ झालेली दिसून येतेय. दरम्यान, दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 63000 ते 65000 हजारापर्यंत जाणार असायचा अदांज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

जळगावातील सोने-चांदीचे अपडेट्स भाव
रोज जाणून घेण्याकरिता क्लिक करा

जळगावातील आजचा चांदीचा दर? Silver Rate Today
दुसरीकडे चांदीच्या किमतीतही मोठी वाढ झालेली दिसून येतेय. सध्या जळगावमध्ये एक किलो चांदीचा दर 76,400 ते 76,500 हजार रुपयांवर (विनाजीएसटी) गेला आहे. यापूर्वी गेल्या सकाळच्या सत्रात चांदीचा दर 74,800 रुपये (विनाजीएसटी) इतका होता. म्हणजेच त्यात एका दिवसात तब्बल 1200 रुपयाची वाढ झाली आहे. दिवाळीपर्यंत चांदी 80000 हजार रुपयाचा टप्पा गाठणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवरील आजचा दर
मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याचा दर 467 रुपयांनी वधारला आहे. यामुळे 24 कॅरेट सोन्याचा दर 61,432 प्रति तोळ्यावर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे चांदीही वाधरली आहे. आज सकाळी चांदीचा दर 905 रुपयांनी वाढला असून एक किलोचा चांदीचा दर 76,305 रुपयांवर व्यवहार करत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.