अर्रर्र..! घसरणीनंतर सोने पुन्हा महागले, 10 ग्रॅम खरेदीसाठी आता ‘इतके’ रुपये मोजावे लागणार

मे 3, 2023 10:30 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२३ । मागील काही दिवसापासून सोने-चांदीचे दर वर-खाली होताना दिसत आहे. सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून यादरम्यान, खरेदीसाठी ग्राहकांची सराफ बाजारात गर्दी दिसून येते. पण सध्या सोने व चांदीच्या किमतीने मोठी उसळी घेतल्याने खरेदी करताना ग्राहकांना मोठी रक्कम मोजावी लागत आहे. दरम्यान, घसरणीनंतर सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ झालेली आहे. सोबतच चांदीची महागलेली दिसून येतेय.

gold jpg webp

जळगावातील आजचा सोन्याचा दर? Gold Rate Today
जळगाव सुवर्ण नगरीत सध्या सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,500 रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका आहे. यापूर्वी मागील सत्रात सोन्याचा भाव 60,300 रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका इतका होता. म्हणजेच सोन्याच्या किमतीत 200 रुपयाची वाढ झालेली दिसून येत आहे.

सोने सध्या 800 रुपयांनी प्रति 10 ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. 14 एप्रिल 2023 रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला. त्यावेळी सोन्याचा भाव 61,300 रुपये (विनाजीएसटी) प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. मात्र दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 63000 ते 65000 हजारापर्यंत जाणार असायचा अदांज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

जळगावातील आजचा चांदीचा दर? Silver Rate Today
सध्या जळगावमध्ये एक किलो चांदीचा दर 74,800 रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. दरम्यान, 14 एप्रिल रोजी जळगावमध्ये चांदीच्या किमतीने 77,500 रुपयाचा (विनाजीएसटी) उच्चांकी दर गाठला होता. तेव्हापासून आतापर्यंत चांदीच्या किमतीत 2700 हजार रुपयाची घसरण झालेली दिसून येतेय. मात्र दिवाळीपर्यंत चांदी 80000 हजार रुपयाचा टप्पा गाठणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवरील आजचा दर
मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. आज सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याचा दर 60,732 प्रति तोळ्यावर व्यवहार करत आहे. यापूर्वी काल सकाळी सोन्याचा दर 59,766 रुपये प्रति तोळ्यावर व्यवहार करत होता. तर दुसरीकडे आज सकाळी चांदीचा दर 75,042 रुपयांवर व्यवहार करत आहे. यापूर्वी काल सकाळी 74,035 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होता

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now