⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | विशेष | पाकिस्तान सीमेजवळ काश्मीरमध्ये जळगावचा हितेश पाटील चालवतो हॉटेल; वाचा सविस्तर

पाकिस्तान सीमेजवळ काश्मीरमध्ये जळगावचा हितेश पाटील चालवतो हॉटेल; वाचा सविस्तर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २१ एप्रिल २०२३ | मराठी माणूस त्यातही खान्देशी तरुण मनात आणलं तर काहीही करु शकतो. याची अनेक उदाहरणे आहेत. खान्देशातील अनेक तरुण भारतातील मेट्रो शहरांसह विदेशातही मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. याच पंगतीत आता हितेश पाटील या तरुणाचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे, आजपर्यंत जे एकाही खान्देशी तरुणाने जे केलेलं नाही असं काम हितेश करतोय. तुम्हाला सर्वांना वाचून आर्श्‍चय वाटेल की, जळगाव जिल्ह्यातील हितेश हा पाकिस्तान सीमेजवळ काश्मीरमध्ये एक हॉटेल चालवतोय. विशेष म्हणजे, खान्देशचे सुपूत्र तथा आयआसएस ऑफिसर संदीपकुमार साळुंखे यांनी या तरुणासोबत अहिराणीमध्ये संवाद असलेला एक व्हिडीओ व्हायरल केला आहे.

समुद्रसपाटीपासून सुमारे नऊ हजार फूट उंचीवर काश्मीर मधील सोनमर्ग येथील संपूर्ण बर्फाच्छादित प्रदेशात मुडी करणखेड्याचा हितेश पाटील नावाचा तरुण हॉटेल चालवतो आहे. संदीप साळुंखे आपल्या परिवारासह काश्मीर फिरायला गेले आहेत. सोनमर्गला पोहचल्यानंतर ते एका हॉटेलमध्ये जेवायला गेले असता तेथे त्यांची हितेश पाटील सोबत भेट झाली. एक खान्देशी तरुण इतक्या लांब येवून स्वत:चे हॉटेल चालवतोय, हे पाहून त्यांना खूपच आनंद झाला. काश्मीरमध्ये खान्देश स्पेशल पिठलं पोळीवर तावं मारल्यानंतर श्री.साळुंखे यांनी हितेश सोबत अहिराणीमध्ये संवाद साधला व त्याचा व्हिडीओ देखील तयार केला. हा व्हिडीओ जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

इच्छाशक्ती असेल तर आपण कुठल्याही परिस्थितीतून जिद्दीने मार्ग काढू शकतो हेच हितेशने दाखवून दिले आहे. तरुणांसाठी हा एक आदर्श आहे. आपल्याला प्रगती करायची असेल, धंदा करायचा असेल तर आपण कुठेही करु शकतो, हे हितेशने दाखवून दिले आहे. जळगाव जिल्ह्यातील तरुणांना संदेश देतांना हितेश म्हणतो की, कामं धंदा करा, घरमा बठीसनं काय फायदा नाहीये…हितेशच्या मेहनतीला जळगाव लाईव्हचा सॅल्यूट…

व्हिडीओ पहा…

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.