जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२३ । गेल्या काही दिवसापासून जागतिक बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाल्याने देशांतर्गत सराफ बाजारात त्याचा परिणाम दिसून आला असून सोन्याच्या किमतीने अडीच वर्षाचा रेकॉर्ड मोडीत काढून नवा विक्रम केला. सोन्याचा भाव 61 हजारांवर (विना जीएसटी) गेला आहे. दरम्यान, काल 22 एप्रिल रोजी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक जण सोने-चांदीची खरेदी करणे शुभ मानतात. अशा ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज सकाळच्या सत्रात सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price) घसरल्या आहेत.
काय आहे आजचा सोने-चांदीचा भाव?
गुडरिटर्न्सनुसार, आज 21 एप्रिल रोजी, सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 200 रुपयांची पडझड झाली. 10 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 56,000 रुपये मोजावे लागतील. तर 24 कॅरेट एक तोळ्याचा भाव 230 रुपयांनी घसरला. आज सकाळच्या सत्रात हा भाव 61,080 रुपये (विना जीएसटी) प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर आज, 21 एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात चांदीत 200 रुपयांची घसरण झाली. आज हा भाव 75,500 इतका आहे.
जळगाव सुवर्ण नगरीतील दर?
जळगाव सुवर्ण नगरीत सोने गेल्या आठवड्यातील किमतीपेक्षा या आठवड्यात घसरली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा एक तोळ्याचा भाव 60,600 रुपये (विना जीएसटी) इतका आहे. यापूर्वी 17 एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात सोन्याचा भाव 60,800 रुपयापर्यंत होता. त्यात आतापर्यत 200 ते 300 रुपयाची घसरण दिसून येत आहे. दुसरीकडे चांदीचा दर आज 75,000 रुपये (विना जीएसटी) किलो इतका आहे.
दरम्यान, उद्या असणाऱ्या अक्षय्य तृतीया व ईदसारख्या शुभ मुहूर्तावर ग्राहकांचा सोने खरेदी करण्याकडे अधिक कल असेल. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या (Gold) भावात प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आता अशातच उद्या पुन्हा सोन्याचे भाव वाढणार का ? हा प्रश्न ग्राहकांना पडतो आहे. आजचं सोने खरेदी करायचे का हा देखील प्रश्न त्यांच्या समोर आहे.