जळगाव जिल्हाजळगाव शहर

जळगावकरांनो खुशखबर : ‘या’ तारखे पर्यंत कर भरल्यास मिळणार १० टक्के सूट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२३ ।  आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कराचा आगाऊ भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना मालमत्ता कर ( खुला भुखंड करासह) व पाणी पट्टी करात १० टक्के सूट देण्यात येत आहे. विशेष म्हणजे महिला मिळकतधारक असल्यास त्यांना ५ टक्के अतिरिक्त सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मनपाच्या मिळकत व्यवस्थापन विभागाकडून दरवर्षी एप्रिल महिन्यात मालमत्ता करात १० टक्के सूट दिली जाते. यंदा महिला मिळकतधारक असल्यास त्यांना १५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही सवलत केवळ एप्रिल महिन्यापर्यंत मर्यादित न ठेवता महापालिकेने मुदत ३० जूनपर्यंत दिली आहे. यामुळे महिला वर्गाला याचा अधिक फायदा होणार आहे. त्यांना १५ टक्के सवलत जाहीर केल्याने महिला वर्गात समाधानही व्यक्त होत आहे.

महिला मालमत्ताधारकांना अतिरिक्त ५ टक्के सवलत चालू आर्थिक वर्षा करीता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १४० अ मधील तरतूदींनुसार, महीलांच्या नांवे असलेल्या फक्त एका राहत्या निवासी मिळकतीस मालमत्ता करात ( राज्य शासनाचे कर वगळून) अतिरिक्त सुट खालील अटी व शर्ती नुसार महापौर यांनी महासभेच्या कार्योत्तर मान्यतेच्या अधिन राहून अंमलबजावणी करणेस मान्यता प्रदान केलेली आहे. त्यानुसार महापालीकेची हि सुट (रिबेट) देण्यात येणार आहे.

Related Articles

Back to top button