जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२३ । यावल तालुक्यातील अट्रावल येथे महापुरूषाच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर दंगल घडली होती. या दंगलीत चार विविध फिर्यादीवरून 205 जणांवर गुन्हे दाखल आहेत. यातील 13 जणांना शासकिय कामकाजात अडथळा निर्माण केल्याच्या गुन्ह्यात अटक करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आल्यानंतर कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयात हजर केले असता संशयीतांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
संशयीतांना न्यायालयीन कोठडी
अट्रावल, ता.यावल या गावात महापुरूषांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर दगडफेक करण्यात आली व दोन्ही गटातील 205 जणांविरूध्द चार वेगवेगळ्या फिर्यादीन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. यातील शासकिय कामकाजात अडथळा निर्माण केल्याच्या गुन्ह्यात 14 जणांना अटक करण्यात आली 13 जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस कोठडीी संपल्यानंतर त्यांना यावल येथील न्यायालयात प्रथमवर्ग न्या.एम.एस.बनचरे यांच्या समोर उभे केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर करीत आहे.